Haindavam Logo - Lord Ganesha
हैंदवम्
📍
Font Size:

मारुति स्तोत्रम्

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥ 1 ॥ महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ॥ 2 ॥ दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा । पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ॥ 3 ॥ लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ॥ 4 ॥ ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥ 5 ॥ ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ॥ 6 ॥ पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ॥ 7 ॥ ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ॥ 8 ॥ कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ॥ 9 ॥ आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ॥ 10 ॥ अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ॥ 11 ॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके । तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ 12 ॥ आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ॥ 13 ॥ धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ॥ 14 ॥ भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ॥ 15 ॥ हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ॥ 16 ॥ रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ॥ 17 ॥

Recite with devotion and pure heart

Regular practice brings spiritual benefits